सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने सांगली जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी व पदवीधर विषय शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन याबाबत कार्यवाही करण्यासाठी साकडे घातले.राज्य संघटक सयाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, सदानंद यादव, संजय डोंगरे,राजेंद्र लोहार, बाबाजान पटेल, संदिप कांबळे यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली.
सांगली जिल्ह्यातील १३६ मंजूर पदा पैकी जून अखेर ९८ पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आणून दिले. १०जून २०१४ च्या अधिसूचनेप्रमाणे ४०-३०-३० च्या निकषानुसार २९ पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात यावीत. पदवीधर प्राथमिक विषय शिक्षकांना पदावनत करणे, आँगष्ट २०१४ मधील नियुक्त विषय शिक्षकांना राज्यातील इतर जिल्हा परिषदेने दिलेल्या निकषानुसार सरसकट ग्रेड वेतन रुपये ४३०० लागू करण्यात यावे, विषय शिक्षकांची रिक्त पदे १३ फेब्रुवारी २०१३ च्या निर्णयाप्रमाणे तातडीने भरती करण्यासाठी ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी तात्काळ सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांना उचित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती शिक्षक समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांनी दिली.
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या या चर्चेत सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रदीर्घ काळ प्रलंबित असणाऱ्या अनेक प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडून उचित कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागास सूचना देण्यात येणार असल्याचे सांगितले.
राज्य नेते किरणराव गायकवाड, पार्लमेंटरी बोर्डाचे सचिव शशिकांत भागवत, शिक्षक बँकेचे चेअरमन सुनिल गुरव,व्हा.चेअरमन महादेव माळी,संचालक तुकाराम गायकवाड, श्रेणिक चौगुले, शशिकांत बजबळे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले रुग्णालयाचे चेअरमन राजेंद्र कांबळे, अजित पाटील, संजय रोकडे, आबासाहेब डोंबाळे, म.ज.पाटील, विष्णूपंत रोकडे, सुरेश नरुटे, विकास चौगुले, नरेंद्र जाधव आदी शिक्षक समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.