भिलवडी ता.पलूस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा व थोर समाजसेविका डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांचा २६ वा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे व विश्वस्त जे.बी.चौगुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
जयंतकेळकर,प्रा.आर.डी.पाटील,प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे,
मानसिंग हाके, डॉ.महेश पाटील,प्रा.मनिषा पाटील,
शुभांगी मन्वाचार,विद्या टोणपे,स्मिता माने,संजय पाटील,सुचेता कुलकर्णी आदी सह सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले.