Sanvad News पंडित विष्णू दिगंबर पलूसकर विद्यालयाच्या वतीने पलूस बसस्थानक परिसरात वृक्षारोपण

पंडित विष्णू दिगंबर पलूसकर विद्यालयाच्या वतीने पलूस बसस्थानक परिसरात वृक्षारोपण


पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयाचे वतीने पलूस बस डेपो परिसरात वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक टी.जे.करांडे , पलूस चे नगरसेवक दिलीप जाधव , किरण निकम ,मोहन सुतार, साळुंखे साहेब ,शिक्षक व्ही.एस.गुरव,ए.के.बामणे,बी.डी.चोपडे,बी.एन.पोतदार,जी.एस.पाटील एम जे शिरतोडे ,सुरेश जाधव,सुनील पुदाले संदीप सावंत,जे.बी. पाटील शिक्षक उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक टी.जे. करांडे म्हणाले वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. नुसते वृक्षारोपण करून चालणार नाही तर या वृक्षांचे संवर्धन ही करावे लागणार आहे. आम्ही आमच्या विद्यालयाच्या वतीने या वृक्षांचे संगोपन ही करण्याची ग्वाही देतो असे सांगितले .वृक्षारोपण नियोजन प्रा. ए.बी.पवार, एस.डी.सावंत, जगन्नाथ सुवासे प्रकाश सदामते रमेश गवळी यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
To Top