Sanvad News सेकंडरी स्कूल भिलवडीचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के

सेकंडरी स्कूल भिलवडीचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के


भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी या विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा  निकाल शंभर टक्के लागला.विद्यालयातून एकूण  221 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.यापैकी विशेष गुणवत्तेत 56, प्रथम श्रेणी 66, द्वितीय श्रेणी 81, पास श्रेणीमध्ये 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयातील प्रथम तीन गुणानुक्रमांक 
प्राप्त  विद्यार्थी पुढील प्रमाणे 
 1) कु. स्वाती श्रीधर कुंभार 97%
 1) कु.श्रुतिका सतीश नलवडे 97%    
 2)कु.सानिका संतोष भोसले 95.20%
 3)कु.समृद्धी सिरसेन मशाळे 93.80%                 

मागासवर्गीय गटात प्रथम तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे                 
 1)कु. श्रुतिका सतीश नलवडे 97%   
  2)कु. समृद्धी सिरसेन मशाळे 93.80%    
 3) कु. अमृता मनेश मोरे 85.00%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.विश्वास चितळे,उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे,सचिव संजय कुलकर्णी, विश्वस्त,सर्व संचालक, मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार,सर्व शिक्षक सहकारी, पालक यांनी अभिनंदन केले. 
सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार,उपमुख्याध्यापकएस.एन. कुलकर्णी,पर्यवेक्षक एस. एल. माने व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.माध्यमिक विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल भिलवडी व  परिसरातून कौतुक होत आहे.         


     
To Top