भिलवडी शिक्षण संस्थेच्या भिलवडी ता.पलूस येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचा २६ वा.वर्धापन दिन कोविड नियमावलीस अनुसरून उत्साहात संपन्न झाला.भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे,उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेबचोपडे यांच्या हस्ते स्व.बाबासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
महापूर काळात उल्लेखनीय योगदान दिले बद्दल सर्व प्राध्यापक व सेवकांचे कौतुक करून भावी काळात आपण महाविद्यालयाचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मनोगत विश्वास चितळे यांनी व्यक्त केले.महापूर काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राध्यापक व सेवक वर्गाचा विश्वास चितळे यांचे हस्ते पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे यांनी केले,सूत्रसंचालन डॉ.सुरेश शिंदे यांनी तर आभार प्रा.व्ही.एस.यादव यांनी मानले.यावेळी संस्थेचे विश्वस्त जे.बी.चौगुले,संचालक जयंत केळकर,सचिव संजय कुलकर्णी,महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.प्रकाश कुलकर्णी ,मुख्याध्यापिका सौ.शुभांगी मन्वाचार,सुकुमार किणीकर, विद्या टोणपे,स्मिता माने आदीसह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.