साने गुरुजी संस्कार केंद्राचे वतीने सांगली जिल्हास्तरीय राष्ट्रभक्तीपर काव्यलेखन स्पर्धा
December 26, 2021
भिलवडी –पूज्य सानेगुरुजी संस्कार केंद्राचे वतिने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वलिखित काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांनी कागदाच्या एका बाजूस कविता सुवाच्य अक्षरात लिहून कविते खाली आपले नाव ,शाळा,संपूर्ण पत्ता व संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा.कविता स्वत: लिह्ल्याबद्दल मुख्याध्यापकांचे पत्र सोबत जोडावे सांगली जिल्ह्यातील इयत्ता ७ वी ते ९ वी तील विद्याथ्यानी बहुसंख्येणे सहभागी व्हावे असे आवाहन संस्कार केंद्राचे वतीने करण्यात आले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सुंदर पुस्तके भेट देण्यात येतील.
Share to other apps