Sanvad News आपल्या आयुष्यातील सहा कादंबऱ्या तुरुंगात लिहिणारा महाराष्ट्राचा अमृतपुत्र म्हणजे साने गुरुजी- मारुती शिरतोडे

आपल्या आयुष्यातील सहा कादंबऱ्या तुरुंगात लिहिणारा महाराष्ट्राचा अमृतपुत्र म्हणजे साने गुरुजी- मारुती शिरतोडे


साने गुरुजी हे महाराष्ट्रातील केवळ थोर स्वातंत्र्यसेनानीच नाहीत तर साहित्याच्या क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असून  प्र के अत्रे यांनी महाराष्ट्राचे अमृतपुत्र अशी  म्हटले होते. साने गुरुजी यांनी लिहिलेल्या अनेक कादंबऱ्या पैकी सहा कादंबऱ्या तुरुंगात लिहिलेल्या आहेत आणि त्यांच्या सर्व कादंबऱ्या सद्गुण प्रेम निस्वार्थीपणा स्वावलंबन  अशा गुणांना उजळा देतात असे प्रतिपादन शिक्षक नेते मारुती शिरतोडे यांनी आज जिल्हा परिषद शाळा नंबर 2 पलूस येथे केले. 
साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या संवाद सोहळ्यात ते बोलत होते.अध्यक्षक्षस्थानी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती शैलजा लाड होत्या.मारुती शिरतोडे म्हणाले की श्यामची आई हे साने गुरुजींचे पुस्तक गेली 85 वर्ष झालं या महाराष्ट्रातच नव्हे तर देशासह जगभरात विविध भाषांतून प्रकाशित झालेले मातृतुल्य प्रेमाचे उत्कट प्रतीक म्हणून गाजत आले आहे. आपल्या शिक्षकी पेशात साने गुरुजीनी केवळ शिकवण्याचे काम न करता विद्यार्थ्यांच्या पालनपोषणाची आजारपणाची सगळी काळजी मनापासून घेतली होती. गांधीजींच्या आवाहनानुसार नोकरीचा राजीनामा देऊन सविनय कायदेभंग चळवळीत उतरल्यानंतर साने गुरुजीनी स्वातंत्र्यलढ्यात अनेक प्रश्नावर अनेक आंदोलने केली.पट पंढरपूरच्या विठ्ठलाच्या त्याला आनंद साठी खुले करा यासाठी उपोषणाचा मार्ग पत्करणारे साने गुरुजी या महाराष्ट्राचे भूषण आहेत त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांना घेऊन साने गुरुजी पुस्तक श्यामची आई हे पुस्तक शालेय वयातच वाचायला हवे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सौ सोनाली चव्हाण यांनी केले तर आभार जगन्नाथ  शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन सौ सुनिता पवार यांनी केले.तर संयोजन संभाजी पाटील यांनी केले.यावेळी विद्यार्थी व काही पालक उपस्थित होते.

To Top