योग शिक्षक दत्तात्रय पाटील यांची भिलवडी शिक्षण संस्थेस पन्नास हजाराची देणगी
Admin
January 08, 2022
समाज व शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने योग प्रशिक्षक दत्तात्रय बाबुराव पाटील यांनी भिलवडी शिक्षण संस्थेस पन्नास हजार रुपयांची देणगी दिली. संस्थेचे विश्वस्त जे.बी. चौगुले यांनी देणगीचा स्वीकार केला.निरोगी आयुष्यासाठी योगासने हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग मानून सर्वांनी योगासने करणे आवश्यक असल्याचे मनोगत व्यक्त केले.योगशिक्षक दत्तात्रय पाटील यांनी विविध प्रत्यक्षिके सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.भिलवड़ी शिक्षण संस्थेच्या वतीने जे.बी.चौगुले यांच्या हस्ते दत्तात्रय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे संचालक जयंत केळकर, सहसचिव के. डी पाटील, विजय तेली आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी केले.उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी यांनी पाहुणे परिचय केला,सूत्रसंचालन एस.एस.मोरे यांनी तर आभार पर्यवेक्षक संभाजी माने यांनी मानले.