ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषे विषयी मनामध्ये कोणताही न्यूनगंड बाळगू नये,जर तुम्हाला जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर सकारात्मकराहून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व निर्माण करा असे प्रतिपादन भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी केले.
भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये इंग्रजी विभाग आणि आय.क्यू ए.सी.यांच्या वतीने आयोजित इंग्लिश स्पिकींग कोर्स च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी डॉ.एस.बी.शिंदे होते.
यापुढे बोलताना मानसिंग हाके म्हणाले की,कला शाखेतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्याकडे डोळसपणे पाहिले पाहिजे.जागतिक स्तरावर आपणाला कर्तृत्वाचा ठसा उमटवयाचा असेल तर इंग्रजी भाषा येणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषा न्यूगंड न बाळगता आत्मसात करा. कार्यकमाचे अध्यक्ष डाॅ.एस.बी.शिंदे यांनी याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कार्यकमाचे स्वागत, प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.आर.एच.भंडारे यांनी केला. सूत्रसंचालन प्रा.सौ.बी.डी.पाटील यांनी केले.तर आभार प्रा.डॉ.एन.एस.गायकवाड यांनी मानले. कार्यकमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी, प्रशासकीय
सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.