Sanvad News चितळे महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती

चितळे महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती


भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिन संपन्न झाा यावेळी या कार्यक्रमास श्री आनंदा उथळे सहाय्यक शिक्षक रा. धनगाव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांच्याहस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले .
या प्रसंगाचे औचित्य साधून श्री . आनंदा उथळे , मा. प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे , डॉ. डी.पी . खराडे प्रा. ए. एन . केंगार यांनी आपली मनोगते व्यक्त केली . जिजाऊचे चरित्र स्रीचे होते . बुद्धी पुरुषाची होती . जिजाऊनी देशाला दोन छत्रपती दिले . शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या घरामध्ये जन्माला यायला हवे त्या अगोदर प्रत्येक घरामधे जिजाऊ जन्माला यायला हव्यात . जिजाऊ व स्वामी विवेकानंद ही दूरदृष्टीची माणस होती ३५० वर्षापूर्वी जिजाऊनी शिवरायांना घालून दिलेले आदर्श आजही आपण वापरात आणत आहोत तर स्वामी विवेकानंदांनी युवा पिढीसमोर घालून दिलेले आदर्श हे युवकांच्या कल्याणासाठी आहेत. या आदर्शाचा पाठपुरावा युवकांनी करून स्वतः चे कल्याण करून घ्यावे .
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.एस.डी. कदम यांनी केले या कार्यक्रमास महाविद्यालयातील कला ,विज्ञान व वाणिज्य विभागाचे सर्व सहकारी बंधू भगिनी उपस्थित होत्या
To Top