संयुक्त महाराष्ट्र समितीचे आणि १०६ हुतात्म्यांच्या हौतात्म्यातुन महाराष्ट्र राज्य साकारले. महाराष्ट्रातील लोकहित आणि राष्ट्रोध्दाराचा वसा घेतलेल्या सुसंस्कृत नेत्यांनी महाराष्ट्राचा कायापालट केला. पण आज कष्टकरीद्रोही राजकारणी सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्रात जात धर्म विद्वेशाचे राजकारण करून महाराष्ट्राची एकात्मता सामाजिक सलोखा आणि शांतता धोक्यात आणत आहेत. हे जातधर्म ध्रुवीकरणाचे राजकारण हाणून पाडले पाहिजे असे प्रतिपादन व्ही वाय पाटील यांनी केले.
व्ही वाय आबा पाटील समाज प्रबोधन अकॅडमी व ग्रामविकास वाचनालय नागराळे आयोजित 1 मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन संयुक्त समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त ग्रामविकास ग्रंथालयास दिलीपदादा पाटील यांच्या हस्ते ग्रंथदान करण्यात आला.
याप्रसंगी दिलीपदादा पाटील, पांडुरंग हजारे, दिपक गायकवाड, महम्मद सैदापूरे बडेभैय, सम्राट पाटील,मिलिंद पाटील, दिनकर पाटील,दत्ता पाटील,राहुल पाटील, अविनाश पाटील, सुधीर पाटील,विशाल दिंडे, सुशांत पाटील, आदि युवक कार्यकर्ते उपस्थित होते. समारोप विशाल दिंडे यांनी केला.