Sanvad News डॉ.पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळा धनगांवचे उज्वल यश

डॉ.पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळा धनगांवचे उज्वल यश


सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या डॉ.पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगाव ता.पलूस या शाळेने उज्वल असे यश प्राप्त केले.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
इयत्ता ७ वी मधील विद्यार्थीनी कु.सानिका संजय साळुंखे हिने २५६ गुण प्राप्त करून जिल्हा गुणवत्ता यादीत १२ वा व पलूस तालुका गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला.संकेत दादासो सूर्यवंशी याने २३४ गुण प्राप्त करून जिल्हा यादीत २३ व तालुका यादीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. कु.सोनम विजयसिंह साळुंखे हिने २०२ गुण व कु.श्रद्धा दिलीप यादव २०२ गुण मिळवून तालुकास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक विजय धेंडे,मुख्याध्यापक संजय डोंगरे, मनिषा चव्हाण,अजित जाधव,सीमा चौगुले,रेश्मा राजगुरू,स्नेहल साळुंखे, आश्विनी गायकवाड आदींचे मार्गदर्शन लाभले.पलूस तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक जाधव,विस्तार अधिकारी सौ.माधुरी गुरव, आमणापूर केंद्राचे केंद्रप्रमुख संजय डोंगरे,सर्व बी.आर.सी.स्टाफ,शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी,ग्रामपंचायत धनगावचे पदाधिकारी, नागरिकांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
To Top