लोकसुधारणेच्या क्षेत्रात राजर्षी शाहू महाराजांनी असामान्य कार्य केले आहे .त्यांच्या कार्यातून व विचारातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी यशाची नवनवीन क्षेत्रे गाठवीत असे प्रतिपादन वक्ते, पत्रकार सहदेव खोत यांनी केले .रेठरे वारणा,ता. शाहूवाडी येथील सरदार माध्यमिक विद्यालयात आयोजित 'लोकराजा : शाहू 'याविषयावरील व्याख्यानातते बोलत जहोते. विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्जेराव साळुंखे हे अध्यक्षस्थानी होते .
यापुढे बोलताना सहदेव खोत म्हणाले, शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाचे नाव अजरामर केले . शाहूंनी आपले कार्य करताना द्रष्टेपण दाखवले .ते फक्त राजे नव्हते एक आदर्श लोकसेवक होते . संस्थानात चौफेर कामगिरी करत त्यांनी जनतेची सेवा केली .त्यांच्या कार्याच्या व विचारांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांनी यश मिळवून जिल्ह्याला सन्मान मिळवून द्यावा .
कार्यक्रमास आर ए पाटील, एस एस वग्रे, वाय बी दळवी यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, व विद्यार्थी उपस्थित होते.पी.टी. कांबळे यांनी स्वागत तर मुख्याध्यापक सर्जेराव साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. एम जी नायकवडी यांनी आभार मानले.