सांगली जिल्हा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतिच प्रसिद्ध झाली. या यादीमध्ये जिल्हा परिषद शाळा कणदूरचा इ. ४ थीचा विद्यार्थी आसद रहीम मुलाणी याने जिल्हा गुणवत्ता यादीत ( जिह्यात २६वा ) स्थान पटकावले व शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला .
कणदूर शाळेतील सदर परीक्षेमध्ये ३ विद्यार्थ्यांनी २०० पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. शाळेचा एकंदर निकाल ८०% आहे. सर्व विद्यार्थ्यांना तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, विस्ताराधिकारी बाजीराव देशमुख, विष्णू दळवी , सुनंदा पाटील व केंद्रप्रमुख दऱ्याप्पा साळे यांची प्रेरणा मिळाली तर शाळेचे मुख्याध्यापक रामराव पाटील , उपशिक्षक अनिल ढोले वर्गशिक्षिका कविता पाटील ,शशिकला कदम यांचेही मार्गदर्शन मिळाले.