Sanvad News शिक्षक बँक सक्षम बनविल्याने पुरोगामी पॅनेलचा विजय निश्चित -शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर ; जोरदार शक्ती प्रदर्शनाने औदुंबर येथे प्रचार शुभारंभ

शिक्षक बँक सक्षम बनविल्याने पुरोगामी पॅनेलचा विजय निश्चित -शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर ; जोरदार शक्ती प्रदर्शनाने औदुंबर येथे प्रचार शुभारंभ



पुरोगामी सेवा मंडळाच्या संचालक मंडळाने स्वच्छ व पारदर्शी कारभार केल्यानेच शिक्षक बँकअर्थिकदृष्ट्या
सक्षम बनली आहे.आमच्या विरोधात लढणारा विरोधक अभ्यासू नाही,त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही.सोशल मीडियावरून लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा आम्ही प्रत्यक्ष कामास महत्त्व देऊन बँक सक्षम केली म्हणून या निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे,विषय फक्त मताधिक्याचा असल्याचे प्रतिपादन शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ आण्णा मिरजकर यांनी व्यक्त केला.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक लि.सांगली च्या पंचवार्षिक निवडणूक सन २०२२-२७ साठी शिक्षक समिती,शिक्षक भारती,शिक्षक संघटना,खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ पुरस्कृत पुरोगामी सेवा मंडळ पॅनेलचा प्रचार शुभारंभ श्री क्षेत्र औदुंबर येथे संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अनिल कादे होते.
***********************************
यापुढे बोलताना विश्वनाथ मिरजकर म्हणाले की,शिक्षक समितीने १९६२ सालापासून फक्त आणि फक्त शिक्षक हिताचे व चळवळीचे राजकारण केले.१९९० ला चेअरमन असताना ठेव जमा करण्यास सुरुवात केली.आज साडेपाचशे कोटीच्या घरात ठेवी गेल्या आहेत. माझी
 कौटुंबिक स्थिती चांगली आहे.मी माझा पगार आणि पेन्शन देखील शिक्षक चळवळी साठी खर्च करतोय.मला कोणत्या च गोष्टीचा स्वार्थ नाही, शिक्षकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन.शिक्षकांसाठी चांगलं काम करीत असल्याने माझे आयुर्मान मात्र नक्कीच वाढून मी निश्चितच शंभरी पार करीन.
****************************************


नाना जोशी म्हणाले की,सहकार क्षेत्र टिकविण्याचे काम खऱ्या अर्थाने शिक्षक बँकेने केले आहे.सभासदाभमुख काम करण्यात राज्यात बँक एक नंबरवर आहे.
शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे म्हणाले की,गेली बारा वर्षे शिक्षक समितीची सत्ता बँकेत आहे.सांगली जिल्हा बँक ही महाराष्ट्रातील सभासदाभिमुख कामकाज करणारी एकमेवबँक आहे.हा आदर्श शिक्षक नेते
 विश्वनाथ आण्णा मिरजकर यांच्या विचाराचा आहे.यंदा आम्हाला विजयाची हाईट्रिक करायची आहे.विरोधकांनी निर्माण केलेल्या अफवांना मतपेटीतून सूज्ञ सभासद उत्तर देतील.
सुरेश पवार म्हणाले की,आर्थिक हितसंबंधासाठी बाहेर पडलेली माणसे विरोधकांच्या रुपात एकत्रित आली आहेत.त्यांना बँकेत प्रवेश देऊ नका.पुरोगामी सेवा मंडळाने सर्व नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.सामान्य मतदारांना विश्वास ठेवावा असे वातावरण निर्माण केले. सध्या चार महिलांना संधी दिली आहे भविष्यात ४० टक्क्यांवर संधी मिळेल.विश्वनाथ मिरजकर आण्णांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व विद्यमान संचालक मंडळाचा कारभार पाहूनलोक बँकेत ठेवी ठेवतात.हा आमचा नैतिक विजय आहे.
सोलापूर जिल्ह्यातून मोठे मताधिक्य देऊन पुरोगामी सेवा मंळाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी होणार असल्याचे मनोगत अनिल कादे यांनी व्यक्त केले.
शिक्षक बँकेचे चेअरमन यु. टी.जाधव म्हणाले की,विरोधकांकडे सोशल मीडिया सोडून दुसरे काहीच नाही.कर्जाचे व्याजदर कमी करण्याचा विक्रम पुरोगामी सेवा मंडळाने केला आहे.विरोधकांकडे पुढील निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी उमेदवार मिळणार नाहीत इतके चांगले काम निर्माण करू.
महिला जिल्हाध्यक्षा सुनिता चौगुले, एस.आर.पाटील,नाना जोशी,राजेंद्र कोरे,पप्पू मुलाणीआदींनी मनोगत व्यक्त केले.प्रसिध्दी प्रमुख विकास चौगुले,आप्पासाहेब दळवी यांचा सत्कार करण्यात आला.
यांनी केला समितीत प्रवेश......
जत तालुक्यातील ७० डी.सी. पी. एस.धारक शिक्षक,महाराष्ट्र राज्यआदर्श शिक्षक समितीचे सरचिटणीस शहाजीसाळे,मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या शांतेश इंगळे,मनिषा पाटील,गुणवंत विधाते यांनी शिक्षक समितीत प्रवेश केला.

 प्रास्ताविक व स्वागत किरण गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी पाटील यांनी केले तर आभार रमेश कोट्टयाळ यांनी मानले.शशिकांत भागवत,बाजीराव सावंत,राजेंद्र कांबळे आदींसह कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले.

२१उमेदवारांनीमांडलीआपली भूमिका.....

सुरेश पाटील,निता पाटील,रामचंद्र देशमाने,कुबेर कुंभार, संगिता महाजन,श्रीकांत शिंदे,कृष्णा पोळ, प्रदिप मोकाशी,राजाराम शिंदे,महेश शरणाथे,राजू शेख,मनोजकुमार कोळेकर,दयानंद मोरे,धरेप्पा कट्टीमनी,अरुण पाटील,हैबतराव पावणे,किशोर कांबळे,प्रियांका पाटील,रागिणी पाटील,सुरेश पाटील,सुरेश नरुटे या २१ उमेदवारांनी आपल्या मनोगतातून आपला परिचय व्यक्त करून देत आपली भूमिका मांडली.

नवनाथ गेंड, एस.आर.पाटील,वर्षाताई केनवाडे,राजेंद्र नवले,एम. डी.पाटील,किरण गायकवाड, पा. बा.पाटील,अरविंद गावडे,किसनराव पाटील,माणिकराव पाटील,संपतराव चव्हाण,हरिभाऊ गावडे,सयाजीराव पाटील,प्रमोद कोडग,अरुण नागणे,अविनाश जकाते,मनोजचव्हाण,म.ज.पाटील,आर.आर.सावंत,दिपक काळे, कादर अत्तार,नंदकुमार पाटील,अशरफ मोमीन आदींसह सांगली सोलापूर जिह्यातील मान्यवर
नेते व शिक्षक उपस्थित होते.


To Top