आदरणीय श्री.पांडुरंग शामराव सूर्यवंशी ( आप्पा) यांचे आज १९ जून रोजी निधन झाले.शिक्षण क्षेत्रातील दिग्गज एक कॄतिशील प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज भिलवडी येथे मुख्य लेखनिक या पदावर कार्यरत होते.मितभाषी,शांत, सुसंस्कृत, शैक्षणिक कामाची जबाबदारी व आवड असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आज हरपले आहे.सेकंडरी स्कूल आणि आप्पा हे एक भिलवडी परिसरात वेगळं नातं होते.शाळेचे कार्यालयीन कामकाज करीत असताना, अत्यंत प्रामाणिक, विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून आप्पा नेहमीच खूप काम करीत होते.सांगली जिल्ह्यातील उच्चांक विद्यार्थी संख्या असणारी सेकंडरी स्कूल ही शाळा आहे.शासनाच्या वतीने शाळांना येणारे परिपत्रके व त्या कामाच्या अनुषंगाने असणारी प्रशासकीय कामे आप्पा अत्यंत काळजीपूर्वक करीत.शाळेच्या कामकाजाची पारदर्शकता आणण्यासाठी त्यांचे सदैव प्रयत्नशील होते.शिक्षण क्षेत्राबरोबरच शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लि.सांगली चे आप्पा प्रमुख मार्गदर्शक होत.परवाच त्यांची सांगली जिल्हा प्रशासकीय सेवक संघटनेचे सहकार्यवाह म्हणून त्यांची निवड झाली होती.राज्यभर आयोजित शिक्षकेतर सेवक सहविचार सभानां आप्पा नेहमीच उपस्थित राहून, प्रशासकीय सेवकांच्या अडचणी याबाबत दक्ष असत.सेकंडरी स्कूल येथे वरिष्ठ लेखनिक पदावर काम करीत असताना, अनेक शिक्षण क्षेत्रातील लोकांशी आप्पाचा निकटचा संबंध होता.एक विद्यार्थी प्रिय प्रशासकीय सेवक म्हणून भिलवडी परिसरात एक वेगळीच त्यांची ओळख होती.अने क विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचे मार्गदर्शन त्यांनी यशस्वीपणे केले आहे.आज आप्पांचे अचानक निधनाने भिलवडी शिक्षण संस्थेची अपरिमित हानी झाली आहे.भिलवडी परिसरात आप्पांचे अचानक निधनाने शोककळा पसरली आहे.आप्पांनां भिलवडी परिसरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
शब्दांकन - संजय तावदर