सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक निवडणूक साठी पुरोगामी सेवा मंडळ (शिक्षक समिती,शिक्षक भारती ,खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ पुरस्कृत) पॅनेलचा भव्य प्रचार शुभारंभ रविवार दिनांक १९ रोजी सकाळी ठीक १०:३० वा.फुटणार आहे.त्यासाठी सांगली व सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शिक्षक उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
नुकतीच सांगली येथे शिक्षक बँकेच्या निवडणूक प्रचारा संदर्भात शिक्षक समितीचे राज्य नेते विश्वनाथ आण्णा मिरजकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
***************************************
यावेळी बोलताना, विश्वनाथ मिरजकर म्हणाले की,गेल्या बारा वर्षांत शिक्षक समितीच्या नेतृत्वाखालील पुरोगामी सेवा मंडळाने सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.विरोधकांकडे बँकेच्या कारभारावर बोलण्यासारखे मुद्देच नसल्याने सभासदांची दिशाभूल करण्यासाठी टीकाटिपणी केली जात आहे.सभासद प्रत्यक्ष मतपेटीतून विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील.
*****************************
सोलापूर जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष अनिल कादे,समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, का बोरसे - पाटील,नाना जोशी,नवनाथ गेंड,वर्षाताई कनेवाडे यांच्यासह राज्यातील प्रमुख पदाधिकारी व नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
श्री क्षेत्र औदुंबर ता.पलूस येथे रविवार दिनांक १९ जून रोजी सकाळी ठीक १०:३० वा.होणाऱ्या निवडणूक प्रचाराच्या शुभारंभास सभासद शिक्षक बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे. शिक्षक समिती ,शिक्षक भारती व खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ यांची अभेद्य युती असणारे व पुरस्कृत असे पुरोगामी सेवा मंडळाच्या शिक्षक बँकेच्या 2022/27 निवडणूकीसाठी उभे असणाऱ्या सर्व 21 उमेदवारांना आपले शुभ आशीर्वाद द्यावेत असे आवाहन प्रचार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.