Sanvad News श्रीमंत लालासाहेब इनामदार विदयालय पलूस येथे जागतिक योग दिन साजरा.

श्रीमंत लालासाहेब इनामदार विदयालय पलूस येथे जागतिक योग दिन साजरा.


श्रीमंत लालासाहेब इनामदार विदयालय पलूस येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहाने योगासने घेण्यात आली.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.बाळासाहेब कटारे  सर,ज्येष्ठ शिक्षिका सौ. लता पाटील मॅडम, मा. सागर तावरे सर तसेच शाळेतीत सर्व शिक्षक-शिक्षिका कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यालयातील शिक्षक मा. सागर तावरे सर यांनी योगासने  बद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रमुख योग गुरु सागर तावरे सर यांनी योगासने, प्राणायाम यांची प्रात्यक्षिके करून बहुमोल मार्गदर्शन केले. शाळेच्या वतीने मा. सागर तावरे सर,  यांचे गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मा.बाळासाहेब कटारे सर मुख्याध्यापक  यांचे मार्गदर्शन लाभले.उपस्थित सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी या सर्वांचे आभार सौ. सारीका पाटील मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

जाहिरात ....





To Top