पलूस प्रतिनिधी
पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक टी.जे.करांडे ,पालक प्रतिनिधी अशोक कुंभार ,योगशिक्षक व्ही. एस. गुरव, क्रीडा शिक्षक एस.डी सावंत ,जेष्ट शिक्षक ए.जे सावंत ए. के बामणे,बी.डी.चोपडे, बी एन पोतदार, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.सर्वानी उत्स्फूर्त सहभाग घेऊन योगाभ्यास केला.विद्यार्थ्यांना निरोगी जीवन जगता यावे. योगाचा प्रसार, प्रचार व्हावा यासाठी योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील शिक्षक , विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला.
पूरक हालचाली,ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, सशांकासान, वक्रासन, भुजंगासन आदी विविध योगाची आसने व व्यायाम प्रकार प्राणायाम घेतले. विद्यालयाचे मुख्याध्यापक टी.जे.करांडे सर,पालक प्रतिनिधी अशोक कुंभार ,योगशिक्षक व्ही. एस. गुरव यांनी योगाचे महत्त्व विविध उदाहरणांनी सांगितले .क्रीडाशिक्षक एस.डी.सावंत यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रशिक्षण दिले. निरोगी, आनंदी जीवनासाठी नियमित योग-प्राणायाम करूया असे आवाहन केले.
संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे ,उपाध्यक्ष विश्वास रावळ ,सचिव जयंतीलाल शहा ,संचालक सुनिल रावळ, सर्व संचालक यांनी सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
जाहिरात..