भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या माध्यमिक विभागांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी, योगअभ्यासक , जायंटस् ग्रुपचे सदस्य श्री. सुबोध वाळवेकर हे मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांनी योग साधनेचे महत्त्व सांगितले.आहार कसा असावा याची माहिती दिली. याबरोबरच कृतीयुक्त योगाचे प्रात्यक्षिक मुलांच्या कडून करून घेण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संजय मोरे यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे , संस्था सचिव मानसिंग हाके , सहसचिव के.डी.पाटील ,शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.एन. कुलकर्णी , उपमुख्याध्यापक एस.एल.माने, पर्यवेक्षिका राजकुमारी यादव , विनोद सावंत , ज्ञानेश्वर भगरे माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक , शिक्षिका व बहुसंख्येने विद्यार्थी सहभागी होते.आभाराची औपचारिकता क्रीडा शिक्षक निलेश कुडाळकर यांनी सांभाळली.