Sanvad News क्लेरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योगदिवस उत्साहात;

क्लेरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योगदिवस उत्साहात;

आष्टा,दूधगाव,भिलवडी,तुंग गावात विद्यार्थ्यांची प्रत्यक्षिके



क्लेरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूल,आष्टा व अंकलखोप येथील सी.बी.एस.ई.बोर्ड स्कूलमध्ये आयुष भारत मंत्रालय अंतर्गत "जागतिक योग दिवस "मोठया आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला .स्कूलचे संस्थापक श्री.राजेश चौगुले,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,मुख्याध्यापक श्री.चंदनगौडा माळी-पाटील,सर्व शिक्षकवृंद,विद्यार्थी कमिटी सदस्य,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
आष्टा नगरपालिका भाग,आष्टा बसस्थानक,दत्त मंदिर परिसर,कर्मवीर चौक दूधगांव,भिलवडी ग्रामपंचायत भाग,तुंग ग्रामपंचायत भाग या सर्व आपल्या ग्रामीण परिसरातील सर्व लोकांना 'सूर्यनमस्कार व नियमित योगासने करण्याचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने असणारे फायदे हे विद्यार्थ्यांनी 'सूर्यनमस्कार प्रात्यक्षिके व विविध भाषणातून प्रकट केले.


त्या-त्या परिसरातील ग्रामपंचायत सरपंच,सर्व सदस्य,प्राथमिक आरोग्य विभाग कर्मचारी,आशा वर्कर्स,सर्व ग्रामस्थ,आष्टा व भिलवडी पोलीस स्टेशन,आष्टा नगरपालिका मुख्यकार्यकारी अधिकारी श्री कैलास चव्हाण साहेब व सर्व स्टाफ यांचा तसेच भिलवडी गावच्या व्यापारी संघटनेचे सदस्य श्री.दिपक पाटील यांचे सर्वांचे या 'शालेय उपक्रमासाठी 'उत्स्फूर्त प्रतिसाद व सहकार्य लाभले.त्यानंतर स्कूलमध्ये इयत्ता १ ली ते ९ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी देखील 'सूर्यनमस्कार व योगासने ' प्रात्यक्षिके सादर केली.
या कार्यक्रमासाठी स्कूलकडून विद्यार्थ्यांचे चार वेगवेगळे ग्रुप बनविण्यात आले होते आणि त्यांना वरील शालेय परिसरातील गावांच्या भागांमध्ये विभागणी करून त्यांच्यासोबत स्कूलचे शिक्षक देखील सहभागी झाले होते.विशेष म्हणजे सर्व कार्यक्रमाचे आयोजन स्कूल शिक्षण व्यवस्थापन व विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आले होते. त्यासाठी त्यांना संस्थापक श्री.राजेश चौगुले,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,स्कूलचे मुख्याध्यापक चंदनगौडा माळीपाटील,क्रीडा शिक्षक अजित सूर्यवंशी व प्रतीक इंगवले,स्कूलचे सांस्कृतिक विभाग प्रमुख विजय पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
To Top