Sanvad News आंतरशालेय ऍथलेटिक स्पर्धेत क्लेरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूल,आष्टा च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी.

आंतरशालेय ऍथलेटिक स्पर्धेत क्लेरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूल,आष्टा च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी.


शनिवार दिनांक २५/०६/२०२२ रोजी ' संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर ' मध्ये आयोजित केलेल्या ' सहोदया ऍथलेटिक मीट 'या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ' आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत ' क्लेरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूल,आष्टा च्या खेळाडूंनी उत्कृष्ट यश संपादन केले.
या स्पर्धेमध्ये एकूण १५ सी.बी.एस.ई. स्कूलचे जवळ जवळ ५०० खेळाडू सहभागी झाले होते.त्या खेळाडूंमधून क्लेरमॉन्ट स्कूलच्या खेळाडूंनी हे यश संपादन केले.जिद्द,चिकाटी व जिंकण्याची  लढाऊ वृत्ती मनात असेल तर कोणतेही यश मिळवणे सहज शक्य होते हे या विद्यार्थ्यांच्या यशोगाथेतून दिसून येते.

स्पर्धेतील यशस्वी खेळाडू खालीलप्रमाणे-
१) ऋतुराज सूर्यवंशी-(उंच उडी,सुवर्णपदक)
२)संचिता निरवाने-(उंच उडी सुवर्णपदक आणि लांब उडी,कांस्यपदक)
३)तनिष्का आडमुठे -(थाळी फेक ,ब्राँझ पदक)

या खेळाडूंना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राजेश चौगुले, मुख्याध्यापक श्री.चंदनगौडा माळीपाटील ,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व  सदस्य,क्रीडा शिक्षक अजित सूर्यवंशी ,प्रतिक इंगवले,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व सर्व पालक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या यशामागे या खेळाडूंनी घेतलेली मेहनत,त्यांच्यामध्ये असणारी कौशल्ये व क्रीडा शिक्षकांचे त्यांना लाभलेले उत्तम मार्गदर्शन  या सर्व खेळाडूंना लाभले.शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा शिक्षणालाही महत्त्वपूर्ण स्थान देणारी,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शारीरिक गुणवत्तेस सतत प्रेरणा व चालना देणाऱ्या आष्टा परिसरातील या एकमेव सी.बी.एस.ई .बोर्ड स्कूलचे सर्वत्र कौतुक होत आहे.
To Top