भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्राइमरी अँड हायस्कूल मध्ये इयत्ता दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.सेवानिवृत्त शिक्षक जिनपाल हनमाने यांच्या हस्ते व संस्थेचे संचालक गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
इयत्ता १०वी मध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त तसेच ९०% पेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना अंकलखोप जिनपाल हनमाने यांच्यामार्फत रोख रक्कम बक्षीसाच्या रूपात देण्यात आली. गेली सात वर्ष ते हा उपक्रम राबवत आहे व पुढेही राबविला जाणार आहे.
तसेच इयत्ता दहावीच्या वर्गास शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक डॉ. सुनिल वाळवेकर, व्यंकोजी जाधव,संस्थेचे सचिव मानसिंग हाके, पालक प्रतिनिधी सौ.लीनाचितळे, मुख्याध्यापिका विद्या टोणपे,सौ. स्मिता माने,यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व यशस्वी विद्यार्थी व पालक देखील उपस्थित होते. सौ. सीमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सौ.अश्विनी महिंद पाहुणे परिचय यांनी करून दिली, सौ.मंजुषा शिंदे यांनी आभार मानले.