Sanvad News आनंददायी शिक्षण उपक्रमात सांगली जिल्ह्याचे योगदान मोठे-मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी; शांतिनिकेन येथे जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न

आनंददायी शिक्षण उपक्रमात सांगली जिल्ह्याचे योगदान मोठे-मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी; शांतिनिकेन येथे जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण उत्साहात संपन्न


आनंददायी शिक्षण उपक्रमात सांगली जिल्ह्याचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनीकेले.सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने शांतिनिकेन येथे आयोजित जिल्हास्तरीय आनंददायी शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला.

सांगली जिल्ह्यातील ५२४ शिक्षकांची उपस्थिती...

आनंददायी शिक्षण प्रशिक्षण जिल्हास्तरीय कार्यशाळेत इयत्ता १ ली ते ४ थी या वर्गांना शिकविणारे २८१ तर इयत्ता ५ वी ते ८ वी या वर्गांना शिकविणारे २४३ असे एकूण ५२४ शिक्षक सहभागी झाले.

यापुढे बोलताना मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की,विविध उपक्रमांचे एकत्रित प्रारूप म्हणजे आनंदायी शिक्षण होय.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळणार असून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित वाढेल असा आशावाद त्यांनी व्यक्तकेला.



शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड म्हणाले की,शाळांमध्ये आनंददायी वातावरण निर्माण होण्यासाठी या उपक्रमात सजगता,गोष्टी,कृती व अभिव्यक्ती या मुद्द्यांनुसार सांगली जिल्ह्यातील शिक्षकांनी उत्तम असे काम केले आहे.या उपक्रमाची दखल  राज्याने घेतली आहे.ही बाब कौतुकास्पद असून सदर प्रशिक्षण हे शिक्षकांना प्रेरणा देणारे असून अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही आनंददायी बनवेल.
यावेळी शांतिनिकेतन चे संचालक प्रा.गौतम पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी रंगराव आठवले,रामचंद्र टोणे,जिल्हा समन्वयक अंजना निकम,श्वेता पाटील प्रशांत शेटे,जिल्हा तज्ञ मार्गदर्शक दयासागर बन्ने,अमोल सातपुते,रघुवीर अथणीकर,वैशाली आडमुठे,गौतम कांबळे,बाबा परीट, भारती राजेशिर्के,संतोष ऐवळे,रुपाली चोथे,भाग्यश्री वेदपाठक,प्रसाद वेदपाठक,अंजली वेदपाठक,वंदना हुलबत्ते,विठ्ठल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.





To Top