भिलवडी. - भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज मध्ये सन 2022 - 23 या शैक्षणिक वर्षांची सुरुवात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देवून व पाठ्यपुस्तकांचे वाटप करुन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक दादासाहेब चौगुले, शाळेचे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक एस. एल माने, पर्यवेक्षिका सौ. राजकुमारी यादव जेष्ठ शिक्षक शशिकांत उंडे यांच्या हस्ते इ. पाचवी ते दहावीतील मुला-मुलींना गुलाब पुष्प व शालेय पाठ्यपुस्तके देवून स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेत्तर सेवक, पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोरे यांनी केले.