Sanvad News आंधळकर हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडामहोत्सव उत्साहात सुरु

आंधळकर हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडामहोत्सव उत्साहात सुरु


आंधळी येथील हिंदकेसरी गणपतरावआंधळकर हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडामहोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला.यावेळी प्रमुख पाहुणे व उद्घाटक सरपंच अमित चव्हाण व उपसरपंच माणिक माने यांचेहस्ते काठमांडू नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल पटकाविल्याबद्दल कु.अबरार शिकलगार,कु.अक्षदा पाटोळे तसेच जिल्हास्तरीय पिंच्याक सॅलेड स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केलेबद्दल कु.कुमकुम कुलकर्णी,कु.गिरीश कोकाटे, वैष्णवी कदम,व नवनाथ पवार यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मन,मेंदू व मनगटाच्या बळकटीसाठी तसेच उत्तम आरोग्य व नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी खेळाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक जयवंत मोहिते यांनी केले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक क्रीडाशिक्षक मंगेश माने,तर आभार डी.सी.चौधरी यांनी मानले.यावेळी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी-पालक,माजी विद्यार्थी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top