Sanvad News विद्यार्थी मित्रांनो आईकडे गोष्टी सांगण्याचा हट्ट धरा - लेखक संदिप नाझरे; खाजगी मराठी प्राथमिक शाळेत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

विद्यार्थी मित्रांनो आईकडे गोष्टी सांगण्याचा हट्ट धरा - लेखक संदिप नाझरे; खाजगी मराठी प्राथमिक शाळेत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न


आजची आई  टिव्ही मालिकांच्या मध्ये दाखवल्या जाणाऱ्या कटकारस्थानामध्ये रमलेली असल्याने विद्यार्थी पालक संवाद हरवत चालला आहे.आजची आई मुलांना झोपताना गोष्टी सांंगत नाही. जिजाऊंनी शिवबाला सांगितलेल्या संस्काराच्या,पराक्रमाच्या गोष्टींमुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. आपले व्यक्तिमत्व सर्वगुणसंपन्न घडण्यासाठी आता विद्यार्थ्यांनीच आपल्या आईकडे  गोष्ट सांगण्याचा हट्ट धरायला हवा असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व पक्षीमित्र संदिप नाझरे यांनी केले. भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन वदिप्रज्वलन करण्यात आले.हस्तकला व रांगोळीप्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. गुणवंतविद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.बालकुंज हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
यापुढे बोलताना संदिप नाझरे म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला योग्य वयात व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे.   विविध विद्यार्थी केंद्रित उपक्रम, कार्यानुभव,स्पर्धा परिक्षा, पहिली त चौथीच्या विद्यार्थांना उपलब्ध करून देण्याचे काम भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी प्राथमिक शाळेच्या माध्यमातून होताना दिसते.


 यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डी.के.किणीकर,जयंत केळकर,संजय कदम,भिलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.विद्या पाटील,माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती सुरैय्या तांबोळी,सौ. सीमा शेटे,माजी मुख्याध्यापिका सौ.अनिता रांजणे,प्राथमिक विभाग प्रमुख प्रा. सौ.मनिषा पाटील,बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे,बालवाडी विभाग प्रमुख सुचेता कुलकर्णी, सौ.प्राजक्ता कुलकर्णी आदींसह पालक,विद्यार्थी उपस्थित होते.
 मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.संजय पाटील यांनी अहवाल वाचन केले. बालकुंज हस्तलिखित निर्मिती विषयी विठ्ठल खुटाण यांनी मनोगत व्यक्त केले.सौ. संध्याराणी मोरे यांनी रांगोळी व हस्तकला प्रदर्शन विषयी माहिती दिली.शरद जाधव व सौ.प्रगती भोसले यांनी सूत्रसंचालन केले.सौ. छाया गायकवाड यांनी आभार मानले.





To Top