थोर गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन राष्ट्रीय गणित दिन म्हणून श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल हरिपूर येथे साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुहास कोळी यांनी केले .त्यानंतर गणित परिपाठ, गणिती उखाणे, गणिती कोडे व गणित गीत व प्रतिज्ञा सादर करण्यात आली .यामध्ये कुमारी अमृता कुंभार, अस्मिता ठोंबरे, श्रावणी जाधव, नंदिनी गंजाळ ,मंजुश्री खोकडे,हर्षदा बोन्द्रे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .कार्यक्रमाचे आभार सुनील खोत यांनी मानले तर संयोजन मनीषा वडदेसाई ,अजित कुमार कोळी, विठ्ठल मोहिते, राजकुमार हेरले यांनी केले याप्रसंगी संध्या गोंधळेकर, पूजा पाटील ,राजाराम वावरे ,बबन शिंदे उपस्थित होते.