Sanvad News अंकलखोप कृष्णाकाठावर भरली पक्षांची शाळा, शंभर विद्यार्थांचा सहभाग; पक्षाकडून बरचं शिकण्यासारखं- संदीप नाझरे.

अंकलखोप कृष्णाकाठावर भरली पक्षांची शाळा, शंभर विद्यार्थांचा सहभाग; पक्षाकडून बरचं शिकण्यासारखं- संदीप नाझरे.


जेव्हा नदी सुरय पक्षांवर घार फिरू लागते, तेव्हा सर्व पक्षी एकदम ओरडून  कल्ला करत उठतात. घिरट्या घालून एकीचे प्रदर्शन घडवितात. सामूहिक प्रयत्नातून एकीचे बळ दाखवत संकटावर मात करता येते असा धडाच पक्षी आपल्याला देतात. पक्षांकडून बरंच शिकण्यासारखं आहे असे मत पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी व्यक्त केले. 
कृष्णाकाठी अंकलखोप येथे वरद क्लासेसचे अतुल पाटील यांच्या वतीने विद्यार्थी व पालकांसाठी पक्षांची शाळा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नाझरे  बोलत होते.
विद्यार्थ्यांना निसर्गातील पक्षांचे महत्व समजावे. त्यांना प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पक्षांची ओळख समजावून घ्यावी. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मनातील अभ्यासाचा ताणतणाव कमी व्हावा अशा उद्देशाने  शिवव्याख्याते अतुल पाटील यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.


या उपक्रमात वरद क्लासेस अंकलखोप अतुल पाटील, मोहन निकम, अरविंद कवठेकर, रमेश पाटील, महेश चौगुले, जमीर सनदी यांच्यासहजवळपास शंभर विद्यार्थी विद्यार्थीनी पालक यांनी सहभाग घेतला. 
यावेळी बोलताना संदीप नाझरे पुढे म्हणाले,
अंगावर परजिवी किटक मारण्यासाठी बर्याचदा पक्षी मातीत लोळून आंघोळ करताना दिसतात. सतत आपल्या अंगावरील पंखांची पिसांची चोचीने स्वच्छता करणारे वेळोवेळी पाण्यात आंघोळ करणारे पक्षी आपल्याला स्वच्छतेची, स्वतः ला नेहमीच ताजेतवाने ठेवण्याची शिकवण देतात. जगातील सर्वात उंच उडणारा चक्रवाक बदक सारखा पाहूणा पक्षी आपल्यासमोर जोडीदाराशी एकनिष्ठ राहण्याच  आदर्श उदाहरण आहे.रोजच्या धकाधकीच्या जगण्याच्या कोलाहलातून बाहेर पडून थोडं निसर्गाचा कानोसा घ्या. किलबिलणारे पक्षी आपल्याला आनंदी करून टाकतात. 
उंच भरारी घेणारे पक्षी आपल्याला कठीण परिस्थिती वर मात करून गरूड भरारी घेण्याची शिकवण देतात.
काडी काडी गोळा करून चिमणी पाखरं आपलं घरटं थाटतात. दोघे मिळून कष्ट करून बाधंलेलं घरटं आपल्याला सहकार्यातून सहजीवनाची प्रेरणा देतात.
To Top