आपली आई जयश्री शिवाजी नलवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त माळवाडी ता.पलूस येथील सामाजिक कार्यकर्ते रोहित नलवडे यांनी भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेस पुस्तके भेट दिली.ते विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
सौ.वैशाली माने व रोहित नलवडे यांचे हस्ते दिलेल्या पुस्तक भेटीचा विद्यालयाचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी स्विकार केला.आईचा पुण्यस्मरण दिनी होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत वाचन चळवळ समृध्द करण्याच्या हेतूने त्यांनी संस्कारक्षम,ऐतिहासिक,वैचारिक आदी प्रकारातील ६८ पुस्तके भेट दिली.विद्यार्थ्यांनी मोबाईलचा गरजेपुरता वापर करून पुस्तकांशी मैत्री करावी असे मनोगत रोहित नलवडे यांनी व्यक्त केलं.
शरद जाधव यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. ग्रंथालय विभाग प्रमुख सौ.संध्याराणी भिंगरादिवे यांनी आभार मानले.यावेळी सौ.छाया गायकवाड,संजय पाटील,प्रगती भोसले,विठ्ठल खुटाण,अर्चना येसुगडे, पुजा गुरव,सफुरा मगदूम,स्वाती पाटील,सारिका कांबळे,प्रियांका आंबोळे,रुकैय्या पटेल,रोहिणी माने आदी उपस्थित होते.