Sanvad News क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतनला शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांची भेट; कामकाज पाहून व्यक्त केले समाधान.

क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतनला शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांची भेट; कामकाज पाहून व्यक्त केले समाधान.



क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी या विद्यालयास सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.मोहन गायकवाड यांनी आकस्मित भेट देऊन पाहणी केली.दैनंदिन शालेय कामकाजा विषयी समाधान व्यक्त केले.
यावेळी सैनिकी पॅटर्न निवासी   शाळेचे व्यवस्थापन, दैनंदिन शालेय कामकाज, शिष्यवृत्ती परीक्षा तयारी,शालेय गुणवत्ता,शालेय उपक्रम,आनंददायी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी,विद्यार्थी आधार अपडेशन, शालेय इमारत,परिसर आदी बाबींची पाहणी केली.शालेय शिस्त,परिसर, सर्व शैक्षणिक सुविधा,विद्यार्थी गुणवत्ता आदी बाबी चांगल्या प्रकारच्या असल्याचे सांगून  कामकाजा विषयी समाधान व्यक्त करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड  यांनी शुभेच्छा दिल्या. ब्रह्मानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक रवी राजमाने यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व विद्यार्थ्यांनी तयार केलेला बुके देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला.यावेळी रमेश हजारे सर,अभिनव तावदर,प्राचार्या स्वाती पाटील,मुख्याध्यापिका दिपाली जाधव आदींसह सर्व शिक्षक उपस्थित होते.


To Top