Sanvad News १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पोलाईट क्रिकेट क्लब ला विजेतेपद; ग्रामीण भागातील खेळाडूंची कामगिरी उत्तम - संजय बजाज

१४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पोलाईट क्रिकेट क्लब ला विजेतेपद; ग्रामीण भागातील खेळाडूंची कामगिरी उत्तम - संजय बजाज


सांगली येथील सुमित क्रिकेट अकॅडमी आयोजित १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पोलाईट क्रिकेट क्लबने अंतिम सामन्यात बल्लाळेश्वर क्रिकेट ॲकॅडमी वरती विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
क्रिकेट ॲकॅडमी व सर्व विजयी खेळाडूंना सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय बजाज यांचे मार्गदर्शन लाभले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची क्रिकेट मधील कामगिरी उत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजांचा बहुमान खंडोबाचीवाडी या.पलूस येथील साईराज संदिप माळी याला देण्यात आला.
सांगली,मिरज,कुपवाड महानगरपालिकेचे महापौर
दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते विजेत्या संघास पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमी ने ५० षटकामध्ये मध्ये १७८ धावांची मजल मारली. गोलंदाजी मध्ये दीप जाधव व फरान आगा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तसेच विराज पाटील आणि उस्मा खान यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. प्रति उत्तरा दाखल खेळताना पोलाइट क्रिकेट क्लबने हे आव्हान ४२ षटकांमध्ये सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. फरान आगा याने नाबाद ४८ तर आयुष भोसले याने ३८ धावा केल्या. फरान आगा याला समनवीराचा बहुमान मिळाला.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा बहुमान फरान आगा याला देण्यात आला.यशस्वी खेळाडूंना पोलईट क्रिकेट क्लबचे ज्येष्ठ प्रशिक्षक सागर पेंडुरकर, विजय वावरे भिलवडी येथील क्रिकेट अकॅडमी मध्ये कसून सराव करत आहेत.


To Top