स्पर्धेच्या जगात जगत असताना क्षेत्र कोणतेही असो, स्पर्धा ही अनिवार्य आहे .स्पर्धांमुळे चुरस वाढून आपण योग्य ध्येयापर्यंत पोहोचू शकतो.जगात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायचे असेल तर वेगवेगळ्या स्पर्धांना सामोरे जाऊन यशस्वी व्हा असे प्रतिपादन साहित्यिक व कवी प्रा डॉ.प्रदीप पाटील यांनी केले.
भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या वतीने आयोजित वार्षिक पारितोषिक समारंभ प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक गिरीश चितळे होते.
गिरीश चितळे म्हणाले की,विविध प्रकारच्या क्षमता विद्यार्थ्यांनी आत्मसात कराव्यात.आत्मविश्वासामुळे आपले जीवन समृद्ध बनते.
नोयडा दिल्ली येथे होणाऱ्या खेलो इंडिया महिला स्विमिंग स्पर्धेच्या प्रशिक्षक पदी निवड झाल्याबदल क्रीडा प्रशिक्षक डॉ. महेश पाटील यांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करणेत आला .
स्वागत व प्रास्ताविक महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांनी केले. प्रमुख पाहुणे परिचय डॉ. श्रीकांत चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. विजय विनोदकर व प्रा.चेतन कणसे यांनी केले आभार प्रा. विश्वास यादव यांनी मानले.यावेळी खंडोबाचीवाडी चे सरपंच धनंजय गायकवाड,
जिमखाना विभाग प्रमुख डॉ. महेश पाटील, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.एस.एस.पाटील , डॉ. एस.डी.कदम उपस्थित होते.