भिलवडी प्रतिनिधी
शिक्षण रत्न बापूसाहेब पाटील विद्यालय अंकलखोप ता.पलूस या शाळेचा विद्यार्थी विराज विजय गोरे याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. सांगली जिल्ह्यातुन एकुण ८० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
एप्रिल २०२३ मध्ये प्रवेश परीक्षा झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये निवड होऊन नवोदय विद्यालय पलूस साठी इयत्ता सहावीच्या वर्गात त्याचा प्रवेश निश्चित झालेला आहे. त्याला शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा घार्गे सर्व शिक्षक, सतीश इंगळे व त्याचे पालक विजय गोरे,राजश्री गोरे या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.निवडीमुळे त्याचे परिसरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.