शिक्षण क्षेत्रातील योगदनाबद्दल गौरव...
पुणे प्रतिनिधी
सांगली जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी व भिलवडी गावचे सुपुत्र मोहन गायकवाड यांना नवभारत प्रेस लिमिटेड मुंबई यांच्या वतीने नवराष्ट्र एज्युकेशन अँड समिट अवॉर्ड २०२३ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
चिंचवड पुणे येथील सभागृहात माजी सनदी अधिकारी व रयत शिक्षण संस्था सातारा चे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी व नवभारत प्रेस चे व्यवस्थापक राजेश वारलेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन मोहन गायकवाड यांचा सन्मानकरण्यातआला.स्मृतिचिन्ह,मानपत्र,
शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मॉडेल स्कूल संकल्पनेचे मार्गदर्शक, एक लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी,आपल्या कामावर निष्ठा ठेवून शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदलासाठी झटणारे शिक्षणाधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कमागिरीबद्दल आणि अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना मिळालेला सन्मान हा सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या शिरपेचातील मानाचा तुरा रोवला आहे.
नवभारत प्रेस यांच्यामार्फत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ओरिसा या चार राज्यातून विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सांगली जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या वतीने तसेच मित्रपरिवाराच्या वतीने शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचा अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••