सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड भेट घेऊन शिक्षकांच्या प्रश्नांसंबंधी निवेदन दिले.सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक सकारात्मक चर्चा केली. शिक्षक संघाच्या शिष्टमंडळा मध्ये जिल्हा सरचिटणीस अविनाश गुरव, शिक्षक बँकेचे संचालक शामगोंडा पाटील, संतोष जगताप, गांधी चौगुले, विटा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजेश निकम, मलकारी होनमोरे, लाखन होनमोरे यांच्या सह शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक व पात्र पदवीधर शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव तात्काळ निर्गमित करावेत. यासंबंधी शिक्षण अधिकारी श्री.मोहन गायकवाड साहेब यांनी आढावा घेतला. बहुतांशी प्रस्ताव तपासून तयार असून पुढील आठवड्यात सदरचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागात मंजुरीसाठी पाठवले जातील असे सांगितले.
अनेक शिक्षकांचे (विशेषतः आटपाडी तालुक्यातील) अपंग वाहनभत्ता व व्यवसायकर माफीचे प्रस्ताव तपासण्यात आलेले असून तेही लवकरच मंजूर केले जातील. मुस्लिम धर्मीयांचा बकरी ईद हा महत्त्वाचा सण २९ जून रोजी असून सणाची सुट्टी मात्र २८ जून रोजी दिलेली आहे; त्यामध्ये शिक्षक संघाच्या निवेदनानुसार बदल करून २९ जून रोजी सुट्टी बाबतचे आदेश जिल्हा परिषद स्तरावर काढण्यात येतील याचा श्री. गायकवाड यांनी सांगितले. शिराळा पंचायत समितीकडील शून्य शिक्षकी शाळेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात नेमणुका दिलेल्या शिक्षकांना मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेण्याची सक्ती करू नये, यावर संबंधित कार्यालयाला जिल्हा परिषद स्तरावरून योग्य त्या सूचना देऊ असे ठरले. आंतरजिल्हा बदली ने सांगली जिल्हा परिषदे कडून बदलून गेलेल्या सर्व शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव लवकरच निकाली काढून संबंधितांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्या त्या जिल्हा परिषदेकडे वर्ग करू असेही शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.