Sanvad News क्लेरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूल, आष्टा येथे ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

क्लेरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूल, आष्टा येथे ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


आष्टा प्रतिनिधी
२१ जून आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून क्लेरमाँन्ट इंटरनॅशनल स्कूल,आष्टा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. सूर्यनमस्कार, विविध योगासने,पूरक हालचाली, प्राणायाम व योग साधना करण्यात आली. संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटावा अशी बाब आहे .शरीर, मन ,समाज व संपूर्ण आरोग्यासाठी योगाचे विशेष  महत्त्व आहे.क्लेरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूलमधील ३००हून अधिक विद्यार्थी व सर्व शिक्षक यांनी सहभाग नोंदवून योग दिवस यशस्वीरित्या साजरा केला.


           प्रमुख पाहुणे श्री. महेश पाटील  आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक २००९पासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या भाषणात योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. योगामुळे आपल्या शरीरात काही आमूलाग्र बदल होऊ शकतात, असेही सांगितले. रोज योगा करण्याचा सल्ला त्यांनी दिला. मुख्याध्यापक श्री. चंदनगौडा माळी पाटील सर यांनी प्राचीन काळापासून भारतीयांशी असलेला योगाचा परिचय समजावून सांगितला.
         पाटील सरांनी योगाचे एक ते दीड तास विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे खूप छान मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद देत उत्साहात आसने सादर केली अशा पद्धतीने आनंदाने योग दिन साजरा झाला.यासाठी संस्थेचे संस्थापक मा.श्री. राजेश चौगुले,व्यवस्थापक श्री.विकास सूर्यवंशी, मुख्याध्यापक श्री. चंदनगौडा माळी पाटील,क्रीडा शिक्षक श्री. अजित सूर्यवंशी व श्री. प्रतीक इंगवले, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

To Top