भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्राइमरी अँड हायस्कूल भिलवडी मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्त्व सांगण्यासाठी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी विश्व योगदर्शन केंद्र सांगली यांच्या मार्फत श्री सतीश वसंत गाडगीळ तसेच श्री वरद अभय मेहेंदळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवत मार्गदर्शन केले.
`इंडियन योग असोसिएशन` अंतर्गत विश्व योग दर्शन केंद्र सांगली गेले नऊ वर्ष कार्यरत आहे. ही संस्था वर्षभर योगासनाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन करतात.
आजच्या या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शकांनी सर्व विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवून योगासने करून घेतले व मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सूर्यनमस्कार आणि ध्यानधारणा यांचे ही मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिक घेतले. मार्गदर्शकांचे स्वागत व ओळख शाळेच्या मुख्याध्यापिका कु. विद्या टोणपे यांनी केले व त्यांचे आभार क्रिडा शिक्षक श्री. सुनील ऐतवडे यांनी मांडली.
संस्थेचे विश्वस्त श्री. सुहास जोशी यांच्या प्रयत्नातून आजची योगसाधना घडून आली. मार्गदर्शक श्री सतिश गाडगीळ यांनी विद्यार्थ्यांच्या मध्ये असणारी लवचिकता व त्यांनी केलेल्या प्रात्यक्षिके यांचे कौतुक केले.