Sanvad News इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात साजरा.

इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात साजरा.


भिलवडी प्रतिनिधी
भिलवडी शिक्षण संस्थेच्या, इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल, भिलवडी मधील  एस. एस. सी.परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.प्रमुख पाहुणे जिनपाल हनमाने यांच्या हस्ते व भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.सुनिल वाळवेकर अध्यक्षस्थानी होते.
  विद्यालयाने निकाल सलग ९ वर्षे विद्यालयाने  १००% निकालाची परंपरा निर्माण केली असून ११ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले.प्रतीवर्षी शाळेतील प्रथम तीन गुणानुक्रमांक प्राप्त विद्यार्थ्याना,अंकलखोप येथील  सेवानिवृत्ती शिक्षक जिनपाल हनमाने ( गुरुजी) यांच्या तर्फे रोख रक्कम स्वरुपात बक्षिसे दिली जातात.  हे  कु. यशदा रमेश हजारे ( प्रथम क्रमांक) चि. तेजस सचिन यादव ( द्वितीय क्रमांक) व कु.आदिती तानाजी जाधव (तृतीय क्रमांक) या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्राप्त झाली. शाळेच्या वतीने त्यांना भेटवस्तू व ट्रॉफी देण्यात आली.तसेच ९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्याना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. 


जीवनातील  उद्दीष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न आणि चिकाटी आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ.सुनिल वाळवेकर यांनी केले.
यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक जयंत  केळकर,व्यंकोजी जाधव, विभाग प्रमुख के.डी.पाटील, बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिपक देशपांडे, प्रा. मनिषा पाटील ,मुख्याध्यापिका विद्या टोणपे, के. जी. विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता माने आदींसह पालक आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत सौ. मंजुषा शिंदे यांनी केले.भाग्यश्री गुरव यांनी सूत्रसंचालन केले.सौ.अश्विनी महिंद यांनी आभार मानले.


To Top