भिलवडी प्रतिनिधी
भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल या विद्यालयाचा मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून सलग नऊ वर्षे १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. प्रथम तीन गुणाानुक्रमांक प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे-
प्रथम क्रमांक -
कुमारी यशदा रमेश हजारे(95.80%)
द्वितीय क्रमांक-
कुमार तेजस सचिन यादव.(95.20%)
तृतीय क्रमांक-
आदिती तानाजी जाधव. (94.60%)
सन 2022- 23 या वर्षामध्ये बोर्ड परीक्षेसाठी एकूण प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 25 होती. त्यापैकी
90% च्या पुढे - 11 विद्यार्थी,75% ते 90% - 8 विद्यार्थी.60% ते 75%- 6 विद्यार्थी आहेत.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका विद्या टोणपे तसेच सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवल्यामुळे संस्थेच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.