Sanvad News श्री म.के. आठवले विनय मंदिर सांगली येथे पाठ्यपुस्तक पारायण सप्ताह

श्री म.के. आठवले विनय मंदिर सांगली येथे पाठ्यपुस्तक पारायण सप्ताह



सांगली प्रतिनिधी
सांगली शिक्षण संस्था , आपल्या शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच, दिनांक १९ जून ते २४ जून २०२३  या कालावधीत  ' पाठ्यपुस्तक पारायण सप्ताह ' आयोजित केला आहे.
         श्री म.के. आठवले विनय मंदिर सांगली येथे या पारायणाची  सुरुवात  आज शनिवार  दि. १७ जून २०२३ रोजी भव्य अशा ग्रंथदिंडीने झाली. पारंपारिक वेशभूषेतील , वारकरी  वेशातील आणि शाळेच्या गणवेशातील इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी काढलेली ही ग्रंथदिंडी अतिशय सुंदर होती. विद्यार्थ्यांच्यामधलेच टिळक, महात्मा फुले, आंबेडकर,  संत ज्ञानेश्वर,मुक्ताई तुकाराम ,शिवाजी महाराज,जिजाऊ अशा अनेक प्रकारच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी रस्ते फुलून गेले होते. शाळा, पुस्तके, वाचन यांचे महत्त्व सांगणाऱ्या  अनेक घोषणांनी रस्ते दुमदुमून गेले होते. 


          या दिंडीचे वैशिष्ट्य असलेली पालखी विद्यार्थ्यांच्या मधोमध होती.  ज्ञानेश्वरी आणि चालू वर्षातील क्रमिक पाठ्यपुस्तकांनी सजलेल्या या  पालखीचे विद्यार्थीच भोई होते. सवाद्य काढलेल्या या ग्रंथदिंडीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक राजाराम वनखंडे सर , दुपारी सत्राचे पर्यवेक्षक  नानासाहेब खाडे सर तसेच  सर्व शिक्षक आणि सेवक यांनी सहभाग घेतला.
To Top