भिलवडी प्रतिनिधी:
सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवाळी अंकांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले.या प्रदर्शनात शंभरहून अधिक दर्जेदार दिवाळी अंक मांडलेले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगपती मकरंद चितळे यांचे हस्ते ग्रंथ प्रदर्शनाने झाली.
यावेळी मकरंद चितळे यांनी उपस्थित ग्रामस्थांना वाचनालयाच्या दिवाळी अंकाचे सभासद होऊन दिवाळी वाचनानंदांनी साजरी करावी असे आवाहन केले. यावेळी सभासद रमेश चोपडे यांना प्रतिनिधिक स्वरूपात दिवाळी अंकांचे दिवाळी अंकाचे वितरण केले.
याप्रसंगी वाचनालयाचे विश्वस्त माननीय जी. जी. पाटील, संचालक डी.आर. कदम, जयंत केळकर, महादेव जोशी आदींसह अनेक मान्यवर वाचक जेष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भाषण वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी केले.प्रदर्शनाचे संयोजन ग्रंथपाल वामन काटीकर,सौ. विद्या निकम, सौ. मयुरी नलवडे व कार्यवाह सुभाष कवडे यांनी केले. वाचनालयाच्या वतीने गेली पंधरा वर्षे दिवाळी अंक उपक्रम राबविला जातो. या उपक्रमास वाचकांचा प्रतिवर्षी भरभरून प्रतिसाद मिळतो. या प्रसंगी देखील अनेक सभासद दिवाळी अंक योजनेचे सभासद झाले. भिलवडी वाचनालयाच्या दिवाळी अंक योजनेत महाराष्ट्रातील नामवंत साहित्य, शेती, क्रीडा, अध्यात्म, पाककला, शिक्षण आदी विषयांचा समावेश आहे. शेवटी पाटील यांनी आभार मानले.