भिलवडी प्रतिनिधी.
भिलवडी येथील पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राचे वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भिलवडी ग्रामपंचायत सफाई कामगारांना दिवाळीआणि भेट वस्तूंचे वाटप करून समाजाची सेवा करणाऱ्या स्वच्छता दूतांची दिवाळी गोड केली. उद्योजक मकरंद चितळे यांचे शुभ हस्ते मिठाई व भेटवस्तू सफाई कामगारांना प्रदान करण्यात आल्या.कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाली.
साने गुरुजी संस्कार केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून या उपक्रमाचा हेतू विस्ताराने विशद केलाा. गेली पंधरा वर्षे संस्कार केंद्राचे वतीने हा उपक्रम सामाजिक भावनेतून राबवित असल्याचे मत सुभाष कवडे यांनी व्यक्त केले.यावेळी सर्व सफाई कामगारांना भेटवस्तू व फराळ देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.
मकरंद चितळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून मुलांच्या दृष्टीने हा उपक्रम संस्कारक्षम असल्याचे सांगितले. श्रीयुत बाळासाहेब मानेे, जी.जी. पाटील, डी. आर. कदम आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते याचवेळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे वतीनेही सफाई कामगारांना फराळ व भेटवस्तू देण्यात आल्याा. संजय गुरव यांनी आभार मानले. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख वसंत धोत्रे व महिलांची उपस्थिती होतीी. सर्व सफाई कामगारांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.