Sanvad News अंबानी, अदानीची कर्जे माफ करणारे महायुतीचे सरकार धोकेबाज - खा. इम्रान प्रतापगढी; डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रचारात भिलवडीत जाहीर सभा.

अंबानी, अदानीची कर्जे माफ करणारे महायुतीचे सरकार धोकेबाज - खा. इम्रान प्रतापगढी; डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रचारात भिलवडीत जाहीर सभा.

     
अंबानी, अदानीची कर्जे माफ करणारे महायुतीचे सरकार धोकेबाज - खा. इम्रान प्रतापगढी; डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रचारात भिलवडीत जाहीर सभा.

भिलवडी प्रतिनिधी :

राज्यात सध्या असलेले सरकार अदानी, अंबानी यांचे कर्ज माफ करेल पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार नाही. सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडणार म्हणून हे महायुतीचे सरकार धोकेबाज आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगढी यांनी केले. भिलवडी ता.पलूस येथेराष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

खा.प्रतापगडी म्हणाले की, येत्या वीस तारखेला महाराष्ट्राच्या राजकारणाचा फैसला होणार आहे. डॉ. विश्वजीत कदम यांना मताधिक्य किती हाच प्रश्न आहे. पलूस - कडेगांव मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांनी आ.डॉ.विश्वजीत कदम यांना पाठिंबा द्यावा. तुम्ही एका आमदारला मत देणार नसून एका कॅबिनेट मंत्र्याला मत देणार असल्याचे ध्यानात घ्या. एक नंबरचे मताधिक्य घेण्यासाठी त्यांची लढाई आहे. तुमचे भाग्य आहे की तुम्हाला या मतदारसंघात विश्वजीत कदम यांच्यासारखा तडफदार आणि धडपडी आमदार लाभला. प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सहभागी होतात. डॉ.पतंगराव कदम यांचे स्वप्न ते ताकदीने पुढे नेत आहेत. येथील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे जनता आणि 

डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रेमापोटी माझाही निधी येथे खर्च करतो असे सांगितले.राज्यातील सरकार भ्रष्ट आहे. या खोकेबाज सरकारला जनताच खाली खेचू शकते. ते काम तुम्ही करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करू आणि सर्वसामान्यांना न्याय देऊ. शेर वापस पलटके आयेगा ही भावनाही त्यांनी व्यक्त केली. 

कुणाल चौधरी म्हणाले की,एकत्रित येऊन या सरकारला धडा शिकवा.अच्छे दिनच्या नावाखाली सत्तेत आले. १५ लाख देण्याच्या वल्गना केल्या. पण कुणाच्याही नावावर १५ लाख आले नसल्याचे सांगितले.

खा.विशाल पाटील म्हणाले, पलूस -कडेगांवची जनता आ.डॉ.विश्वजीत कदम यांना देशाचे नेते म्हणून घडवणार आहे. सांगलीत त्यांनी लोकसभा निवडणुकीत चुणूक दाखवली त्यामुळे महाराष्ट्रात त्यांना काहीच अवघड नाही. 

आ.अरुण लाड म्हणाले, या महायुतीच्या सरकारने जनतेला फसवले आहे. तरुणांच्या हाताला रोजगार दिला नाही. कोणतीही नवीन भरती केली नाही. उद्योगधंदे उभा केले नाहीत. आपल्या हक्काचे होतं ते काढून घेतले. 


आ.डॉ.विश्वजीत कदम म्हणाले की, गंडवणारं, फसवणारं हे महायुतीचे सरकार आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार, वारकऱ्यांवर होणारे लाठीचार्ज अजिबात खपवून घेतला जाणार नाही. आपलं सरकार हे दिल्ली आणि गुजरातसमोर झुकणारे नाही. स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्या कर्तृत्वातून ४०-४५ वर्षात मतदारसंघाला नाव मिळवून दिले आहे. महापूर आलेल्या या भिलवडी परिसरात साहेबांनी सोनिया गांधीचा दौरा घडवला. सर्व नुकसान झाल्याचे सांगितले. डॉ. पतंगराव कदम यांनी मतदारसंघाचा चौफेर विकास साधला. जनता हाताच्या पाठीशी असल्याने या मतदारसंघाच्या मातीला नक्कीच मंत्रीपद मिळते. ते पुढे म्हणाले,येथील नेते संग्राम दादा पाटील माझे ज्येष्ठ बंधू होते. त्यांच्या अकाली निधनाने माझा ढाण्या वाघ गेला आहे. त्यांची नेहमीच मदत मला या निवडणुकीत होत असे. तुम्ही सर्वांनी मला ताकद द्या हा मतदारसंघ हिंदुस्थानच्या नकाशावर नेतो अशी ग्वाही दिली.

दरम्यान खा.इम्रान प्रतापगढी व आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्याहस्ते नागठाणे येथील कार्यकर्त्यांनी डॉ.विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले.

माजी आमदार मोहनराव कदम, खासदार विशाल पाटील,  पलूस तालुका काँग्रेसचे नेते महेंद्र लाड, भिलवडीचे नेते राजुदादा पाटील,युवा नेते पृथ्वीराज पाटील, प्रतीक संग्राम पाटील, भिलवडी सरपंच सौ.सीमा शेटे,पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतपाल साळुंखे,बाळासाहेब मोहिते यांच्यासह सर्व गावातील सरपंच व सदस्य उपस्थित होते.यावेळी भिलवडी परिसरातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी सभेसाठी मोठी गर्दी केली होती.

To Top