माता भगिनींनो जनतेला साथ देणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहूया -स्वप्नालीताई विश्वजीत कदम ;भिलवडी स्टेशन, खंडोबाचीवाडी, वसगडे येथील महिलांशी यांनी साधला संवाद
भिलवडी :
डॉ.पतंगराव कदम यांचं काम तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. तुमच्याशी नाळ त्यांची घट्ट होती. या मतदारसंघात ते ४५-५० वर्षे कार्यरत होते. साहेबांच्या पश्चात आ.डॉ. विश्वजीत कदम यांना तुम्ही जी साथ दिली ती महत्त्व पूर्ण अशीच आहे.माता भगिनींनो जनतेला साथ देणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहूया असे आवाहन स्वप्नालीताई विश्वजीत कदम यांनी भिलवडी स्टेशन, खंडोबाचीवाडी, वसगडे येथील महिलांशी संवाद साधताना व्यक्त केले.
यापुढे बोलताना स्वप्नालीताई कदम म्हणाल्या की, पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन, खंडोबाचीवाडी, वसगडे येथे त्यांनी महिला, तरूणी यांची भेट घेऊन डॉ.विश्वजीत कदम यांना मताधिक्याने निवडून आणा अशी साद घातली. त्या पुढे म्हणाल्या, पलूस व कडेगांव तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाची गंगा वाहते आहे. ती केवळ आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्यामुळेच. भारती विद्यापीठच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे. महापूर आणि कोरोनात त्यांनी जनतेला रात्रंदिवस मदत केली. म्हणून या मदत करणाऱ्या, सहकार्य करणाऱ्या नेतृत्वाला साथ द्या असे आवाहन केले.
दोन दिवसांपूर्वी त्या नेर्ली ता. कडेगांव येथील आजीबाईंना भेटून त्यांची आस्थेने विचारपूस केली. माळवाडी ता.पलूस येथेही काही महिला रुग्णांची भेट घेत काळजी घेण्यास सांगितले. अगदी साहेबांचे विचार बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नीसुद्धा चालवत असल्याचे ज्येष्ठ महिलांनी सांगितले.
ऋतुजा विक्रमसिंह पाटील, माधुरी सावंत, कस्तुरी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्या पाठीशी नारीशक्ती खंबीर आहे. पलूस - कडेगांव मतदारसंघातील सर्व महिला आपल्या भावाच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील अशी खात्री दिली.
सूत्रसंचालन अनिता मंडले यांनी केले.यावेळी सरपंच सुरैय्या तांबोळी, मिनाक्षी सावंत, प्रणाली पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.