Sanvad News पलूस - कडेगांवचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय - आ. डॉ.विश्वजीत कदम; नागठाणे,अंकलखोप येथील संवाद दौऱ्यास मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद

पलूस - कडेगांवचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय - आ. डॉ.विश्वजीत कदम; नागठाणे,अंकलखोप येथील संवाद दौऱ्यास मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद

   
पलूस - कडेगांवचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय - आ. डॉ.विश्वजीत कदम; नागठाणे,अंकलखोप येथील संवाद दौऱ्यास मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद 

भिलवडी प्रतिनिधी :

पलूस-कडेगाव मतदारसंघात जनतेच्या पाठिंब्यामुळे कायापालट करणे शक्य झाले आहे. आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून पलूस-कडेगांवचे नाव जगाच्या नकाशावर झळकावण्याचे माझे ध्येय असल्याचे आमदार डॉ.विश्वजीत कदम यांनी सांगितले.डॉ.कदम यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नागठाणे व अंकलखोप या गावांमध्ये दौरा करून ग्रामस्थांशी संवाद साधला. 

यापुढे बोलताना ते म्हणाले की, पलूस-कडेगाव मतदारसंघात डॉ. पतंगराव कदम यांनी भक्कम कामगिरी केली आहे. त्यांच्या पश्चात सर्वांगीण विकासासाठी विविध योजना मी राबविल्या. लागेल ती मदत माझ्या माणसांसाठी मी करतो. भविष्यातही मदत आणि सहकार्य करण्यासाठी कमी पडणार नाही. जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि खंबीर साथ देणारे कार्यकर्ते हीच माझी खरी ताकद आहे. अन् त्यामुळेच मतदारसंघात भविष्यातील विकास योजनांची रूपरेषा कशी असावी याचा अभ्यासही मी करतोय. विकासकामांना अधिक गती देण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला.

आ.डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची व अस्मितेची लढाई आहे. महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या लोकसेवेची पंचसूत्री व जाहीरनाम्यातून नवा प्रगत महाराष्ट्र घडवण्याचा आमचा निर्धार आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आणि तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचा पुढाकार असेल.डॉ.कदम यांनात रूण कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सांगितले की, महापूर आणि कोरोनात तुम्ही आमच्यासोबत होता त्यामुळे तुमचा प्रचंड मताधिक्याने विजय होणार हे निश्चित. आ.डॉ.विश्वजीत कदम यांनागावोगावी जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. यावेळी ग्रामस्थ, माता-भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top