निवडणूक काळात स्थानिक पातळींवर शाळांना सुट्टी देण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; शिक्षण आयुक्तांचा आदेश
पुणे प्रतिनिधी :
विधानसभा निवडणुकीत मतदान कालावधी दरम्यान बहुतांशी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजासाठी जावे लागले.शाळेत पुरेसा शिक्षक वर्ग नसल्याने कामकाज चालणार कसे ? हा प्रश्न राज्यभरातील शाळांना भेडसावत असतो.शिक्षक संघटनांच्या मागणीवरून शिक्षण आयुक्त सूरज मांढरे पुणे यांच्या कर्याल्यायाच्यावतीने आदेश काढून सुट्टी बाबतचे सर्व अधिकार शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
२० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणुक होत आहे.त्यासाठी १८ व १९ नोव्हेंबरला सुट्टी घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती.
१८ व १८ नोव्हेंबर रोजी नियमित वेळापत्रकानुसार शाळा सुरू राहतील.या दिवशी शासनाने कोणतीही शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली नाही.ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची निवडणूक कामासाठी नियुक्ती केली असेल व शालेय कामकाजासाठी एकही शिक्षक उपलब्ध राहू शकत नसेल अशा शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात स्थानिक पातळीवर सुट्टी जाहीर करावी.अशी अपवादात्मक परिस्थिती वगळता इतर शाळांना कोणतीही सुट्टी घेता येणार नाही.