Sanvad News पलूस येथील पत्रकार परिषदेत आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचा वचननामा जाहीर; डोंगराईदेवीच्या पायथ्याशी स्वराज्य संविधान स्मारक साकारणार

पलूस येथील पत्रकार परिषदेत आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचा वचननामा जाहीर; डोंगराईदेवीच्या पायथ्याशी स्वराज्य संविधान स्मारक साकारणार

 पलूस येथील पत्रकार परिषदेत आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचा  वचननामा जाहीर; डोंगराईदेवीच्या पायथ्याशी स्वराज्य  संविधान स्मारक साकारणार 


पलूस प्रतिनिधी:
 कडेगाव तालुक्यातील कडेपुर येथील डोंगराई देवीच्या पायथ्याशी स्वराज्य संविधान स्मारक उभारले जाईल.येथे शिवछत्रपती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळे साकारले जातील. हे स्मारक स्वराज्य आणि संविधानाचे मूल्ये जपणार आहे. यासोबतच चौरंगीनाथ आणि डोंगराई देवीच्या तीर्थक्षेत्रांचा पर्यटन विकास केला जाईल व या ठिकाणी केबल लिफ्ट कार प्रकल्पाची उभारणी केली जाईल असा आगामी पाच वर्षांच्या काळातील संकल्प आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी जाहीर केला. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. विश्वजीत कदम यांनी आज पलूस येथे आयोजित पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकीसाठी त्यांचा संकल्प व वचननामा जाहीर केला.यावेळी त्यांनी आपल्या विकासात्मक धोरणांची विस्तृत माहिती दिली.
        यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड,शिवसेनेचे नेते संजय विभुते यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डॉ. कदम म्हणाले, “पलूस आमच्या विकासाच्या योजनांमध्ये पलूस नगरपरिषदेच्या भव्य इमारतीची उभारणी, कडेगाव प्रांत कार्यालयाचे नूतनीकरण, कडेगाव येथे उपजिल्हा रुग्णालय ,एमआयडीसी कामगारांसाठी आरोग्य विमा योजना यांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांना अधिक सुलभ आणि सक्षम सेवा मिळतील.तरुणांसाठी रोजगार निर्मिती हा प्रमुख मुद्दा असल्याने “बोंबाळेवाडी व पलूस एमआयडीसी मध्ये नव्या उद्योगांच्या पायाभरणीच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळवून देणार आहे. तसेच, एक नॉलेज सेंटर सुद्धा उभारण्यात येईल ज्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी, वर्क फ्रॉम होम करणारी तरुणाई आणि उद्यमशील व्यक्तींना सुविधा उपलब्ध होईल.याबरोबरच, कृषी संशोधन केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य क्लिनिक सुरू करणे यावरही डॉ. कदम यांनी भर दिला.महिलांसाठी आत्मनिर्भर महिला योजना' गृहिणींसाठी कौशल्य विकास केंद्र उभारण्याची घोषणा त्यांनी केली. 
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

पलूस येथे अद्ययावत स्टेडियम उभारणार :

पलूस आणि कडेगाव तालुक्यात दरवर्षी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करणे, क्रीडा क्षेत्रातील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण देणे, तसेच क्रीडा शिबिरे आयोजित करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे,”यासाठी पलूस येथे अद्ययावत स्टेडियम उभारण्यात येईल असे आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी सांगितले.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

कडेगाव येथे सुसज्ज भारती हॉस्पिटल- 

कडेगाव येथे सर्व सोयी सुविधांनियुक्त असे भारती हॉस्पिटल साकारणार आहे.पुणे आणि सांगली येथील हॉस्पिटलच्या धर्तीवर हे हॉस्पिटल उभारण्यात येईल. 


To Top