Sanvad News भिलवडी जिल्हा परिषद गटातून संग्रामसिह देशमुख यांना विक्रमी मताधिक्य मिळेल - माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर

भिलवडी जिल्हा परिषद गटातून संग्रामसिह देशमुख यांना विक्रमी मताधिक्य मिळेल - माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर

 भिलवडी जिल्हा परिषद गटातून संग्रामसिह देशमुख यांना विक्रमी मताधिक्य मिळेल - माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर 


भिलवडी प्रतिनिधी: पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संग्रामसिह देशमुख  यांना भिलवडी जिल्हा परिषद गटातून प्रचंड मताधिक्याने निवडून देणार असल्याचा विश्वास सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनी दिला.संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचार्थ माळवाडी येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

 यापुढे बोलताना ते म्हणाले की,संग्रामसिह देशमुख जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यावेळी प्रचंड प्रमाणात त्यांनी विकास कामे केली आहेत. एखाद्या आमदाराला लाजवतील इतकी विकासकामे भाऊंनी केली आहेत.असं विकासाभिमुख नेतृत्व पलूस कडेगाव मतदार संघाला लाभणं म्हणजे विकासाची दिशा मिळणे  त्यामुळे संग्राम सिंह देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन प्रचार बैठकांमध्ये केले. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रचंड विकास निधी खेचून आणला आहे. याचा फायदा संग्रामसिह देशमुख यांना नक्कीच होईल. महायुतीच्या सरकार  स्थापन झाल्यापासून अनेक योजना राज्य शासनाकडून राबवल्या जात आहेत.यामध्ये लाडकी बहीण योजना प्रभाविपणे राबवली आहे. याचा विचार महिला नक्की करतील. भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष असताना भरपूर निधी जिल्ह्याला दिला आहे. त्यामध्ये पलूस कडेगाव मतदार संघात  कोट्यावधीची विकासकामे केली आहेत.एक वेळ संग्राम भाऊंना आमदार म्हणून निवडून व भरघोस मतांनी विजयी करा. ह्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाहीत 

     यावेळी जयदीप देशमूख,भाजप पलूस तालुका अध्यक्ष ऋषीं टकले,रोहित नाना उधोजक रमेश पाटील,अशोक पाटील, आशाताई मोहिते, रोहित नलवडे उपस्थिती होते.

To Top