Sanvad News उगळे आणि कदम परिवाराचा जिव्हाळा सदैव जपणार -स्वप्नालीताई कदम, आमणापूर येथे आ.डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रचारार्थ ग्रामस्थांशी संवाद

उगळे आणि कदम परिवाराचा जिव्हाळा सदैव जपणार -स्वप्नालीताई कदम, आमणापूर येथे आ.डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रचारार्थ ग्रामस्थांशी संवाद

 उगळे आणि कदम परिवाराचा जिव्हाळा सदैव जपणार -स्वप्नालीताई कदम, आमणापूर येथे आ.डॉ. विश्वजीत कदम यांच्या  प्रचारार्थ ग्रामस्थांशी संवाद


लूस प्रतिनिधी:  

स्व.राम उगळे भाऊ आणि कदम साहेब यांचे जिव्हाळ्याचे संबंध सर्वश्रृत आहेत. तोच जिव्हाळा जपण्याचे काम विश्वजीत कदम साहेब करत आहेत.  उगळे आणि कदम परिवाराचा जिव्हाळा सदैव जपणार आहे. आमणापूर गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य असेच सुरू राहीलआमदार डॉ. विश्वजीत कदम यांना राज्यात विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी रहावे असे आवाहन स्वप्नालीताई कदम यांनी केले.

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार डॉ.विश्वजीत पतंगराव कदम साहेब यांच्या निवडणुक प्रचारार्थ स्वप्नाली विश्वजीत कदम व भारती लाड यांच्या उपस्थितीत आमणापूर येथील  उगळे वाड्यात हळदी-कुंकू समारंभ व महिला मेळावा प्रसंगी त्या बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या, आमणापूर परिसराने नेहमीच पाठीशी राहून मताधिक्य दिल्याने हा  परिसर डॉ. विश्वजीत कदम साहेबांचा सर्वात आवडता परिसर आहे.  आमणापूर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी  मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी डॉ. विश्वजीत कदम साहेब सदैव आग्रही राहतील. असा विश्वास कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

आमणापूर ग्रामस्थांच्या वतीने वैभव उगळे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी  गौरी भोसले, मालन मोहिते माजी अध्यक्ष5 जिल्हा परिषद सांगली, अँड.मनिषा रोटे चिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, पुनम लाड सदस्या क्रांती महिला प्रतिष्ठान कुंडल, मिनाक्षी सावंत, श्वेता बिरनाळे, प्रणाली पाटील,  वैशाली   उगळे ,सुनिता   भोसले, विद्यमान सदस्या,   .मंगल   कदम,  वैशाली   पाटील, सुनिता   अनुगडे, संगीता   कदम, मोहिनी   शिंदे, मंगल   मतकरी, रेखा   माने, छाया   कदम, वंदना   चव्हाण, फरीदा  संदे, सुनिता  राडे, माजी उपसरपंच मंगल  तातूगडे ,  विठ्ठलवाडी सरपंच  दिपाली विनायक कोळी,  सुजाता   पाटील आमणापूर येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.

To Top